बायकोशी अपशब्द बोलला ; मित्राला निर्जनस्थळी बोलून काटा काढला ! पुण्यातील घटना ..!!


पुणे : पत्नीबाबत अपशब्द बोलला म्हणून मित्राचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.नऱ्हे परिसरात खून करुन बेवारसरीत्या हा मृतदेह आढळून आल्यानंतर खूनाचा प्रकार उघडकीस येऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सौरभ रुपेश शिंदे (वय-23 रा. राम मंदिराजवळ, आंबेगाव पठार, कात्रज असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

अनिकेत मुकुंद परदेशी (वय-28 रा. अभिनव कॉलेज रोड, नंदनवन सिटी, नऱ्हे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सौरभचे वडील रुपेश नामदेव शिंदे (वय-49 रा. आंबेगाव पठार पोलीस चौकी जवळ, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आणि आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. सौरभ आरोपीच्या घरी जेवण करत होता. त्यावेळी त्याने अनिकेतच्या पत्नीबाबत अपशब्द बोलला. याचा राग मनात धरुन अनिकेत याने सौरभला स्वामी नारायण मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने सौरभच्या डोक्यात कठीण वस्तुने मारुन त्याचा खून केला.

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव (API Rahul Yadav) करीत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!