यशस्वी व्हा! आजपासून राज्यातील शाळा सुरू, दीपक केसरकरांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा…

पुणे : आजपासून राज्यातील शाळा सुरू होत आहे. विदर्भ वगळता राज्यातील शाळा आज सुरू होत आहेत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनोखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शाळेचा पहिला दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा असतो.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडूनही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी राज्याचे भविष्यातील नेतृत्व आहे. राज्याचा शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे.
राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विविध निर्णय घेतले आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घ्या. यशस्वी व्हा, अशा शब्दांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केले आहे. एकाच पुस्तकामध्ये सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे.
सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि सॉक्स देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना शेतीविषयक ज्ञान देण्यासाठी, शेती विषय शिकवण्यात येणार असल्याची माहिती दीपक केसरकार यांनी दिली.