शाळकरी मुलीचं अपहरण करून वारंवार सामुहिक बलात्कार, नागपूर येथील घटनेने खळबळ…


नागपूर : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका १२ वर्षांच्या शाळकरी मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला आहे.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेवरील अत्याचाराचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची आणि मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.

करण आणि रोहित असं गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींची नावं आहेत. पीडित मुलगी सहाव्या वर्गात शिकते. गुरुवारी (२३ ऑक्टोबर) ही संतापजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, घटनेच्या दिवशी आरोपींनी अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केले आणि तिला नागपूरजवळील एका लॉजवर घेऊन गेले. तिथे या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. एवढेच नाही, तर त्यांनी या विकृत कृत्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला.

तसेच या प्रकाराबद्दल कुणालाही सांगितल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू, तुला जीवे मारू अशी धमकीही नराधमांनी पीडितेला दिली. त्यामुळे भीतीने दबलेल्या मुलीने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही.

मात्र, शुक्रवारी सायंकाळी मुलीच्या आई-वडिलांना काहीतरी अयोग्य घडल्याचे लक्षात आले. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यावर तिने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.

धक्कादायक घटना कळताच मुलीच्या आई-वडिलांनी त्वरित नंदनवन पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!