School Holiday : शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळी सुट्या जाहीर, किती दिवस सुट्या?
School Holiday : उन्हाळा लागला की विद्यार्थ्यांना सुट्ट्यांची चाहूल लागते. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा संपायची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना सुट्ट्या कधी लागणार आहेत, यासंदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.
राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना २ मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे.
शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील शाळा १ जुलैपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तब्बल १ महिना सुट्ट्या असणार आहेत.
शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकवाक्यता, सुसंगती राहण्यासाठी उन्हाळी सुट्टी, शैक्षणिक वर्ष २०२४-२५सुरू करण्याबाबतच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. School Holiday
त्यानुसार राज्यातील शाळांना २ मे २०२४ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार काही उपक्रम सुरू असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने स्पष्ट आदेश दिले आहेत.
दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच २०२४- २५ मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून २०२४ पासून सुरु होणार आहेत. कारण जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेण्यात आला आहे.