मुख्याध्यापकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार…!

मुंबई : दक्षिण मुंबईतील नागपाडा भागातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आरोपी मुख्याध्यापक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचे त्याच शाळेतील मुलासोबत असलेले प्रेम प्रकरण घरी सांगण्याची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला. मुख्याध्यापकाने मुलीला केबिनमध्ये बोलावून हे कृत्य केल्याची माहिती पीडितेने दिली. याप्रकरणी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापकाने या पूर्वीही पीडित मुलीचा दोनवेळा विनयभंग केला होता. याप्रकरणी तक्रार दाखल करताना पीडितेच्या माहितीनुसार पहिली घटना डिसेंबरमध्ये घडली होती. मुख्याध्यापकाने दुसऱ्यांदा पुन्हा दुष्कृत्य केल्यानंतर मुलीच्या मनावर परिणाम झाला. यामुळे तीच्या वागण्यात बदल झाल्याने पालकांनी तिची विचारपूस केली. त्यानंतर या घटनेची माहिती समोर आली.
त्यानंतर तातडीने पीडिकतेच्या पालकांनी थेट पोलिस ठाणे गाठले आणि मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर आरोपी मुख्याध्यापक हा फरार झाला आहे.