लक्झरी कारच्या नावाखाली शेकडो कोटींचा घोटाळा! 12 ठिकाणी धाड, कारवाईने पुण्यात एकच खळबळ…


पुणे : पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी रोड शाखेत तब्बल 19.38 कोटी रुपयांचा लक्झरी कार कर्ज घोटाळा उघड झाल्याने आर्थिक जगतात खळबळ माजली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे महागड्या गाड्यांचे लोन मंजूर करून बँकेची मोठी फसवणूक करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयने मोठी कारवाई केली आहे.

मंगळवार ते बुधवार दरम्यान ईडीनं पुण्यातील १२ ठिकाणी छापे टाकून अत्याधुनिक लक्झरी कार आणि महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले. ही संपूर्ण कारवाई CBI ACB, पुणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या FIR वर आधारित आहे.

दरम्यान, या घोटाळ्यात बँकेचे माजी चीफ मॅनेजर अमर कुलकर्णी, ऑटो लोन काउन्सलर आदित्य सेठिया आणि काही निवडक कर्जदार यांच्यातील संगनमत उघडकीस येत असल्याचे ED अधिकाऱ्यांनी सांगितले. बनावट कागदपत्रांची साखळी तयार करून अनेकांनी लाखो-कोट्यवधींची कर्जे उचलल्याचा संशय आहे.

२०१७ ते २०१९ या कालावधीत बँकेची लेंडिंग पॉलिसी पूर्णपणे डावलून ही कर्जे मंजूर करण्यात आली. अमर कुलकर्णी यांनी निवडक कर्जदारांना मदत करण्यासाठी बनावट आणि वाढीव किंमतीच्या कोटेशन्स बँकेत सादर केल्याचे तपासात समोर आले. या कोटेशन्सच्या आधारे कारची किंमत प्रत्यक्षापेक्षा जास्त दाखवून कर्जरक्कम वाढवली जात होती. यामुळे बँकेचा थेट कोट्यवधींचा तोटा झाला.

ईडीच्या तपासानुसार काही आरोपींनी पूर्णपणे फसवी कागदपत्रे तयार करून BMW, Volvo, Mercedes, Range Rover सारख्या उच्च दर्जाच्या गाड्यांसाठी कर्ज मंजूर करून घेतले. अनेक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी न करता लोन मंजुरी देण्यात आली, ज्यातून बँक अधिकाऱ्यांचे संगनमत पूर्णपणे स्पष्ट झाल्याचे म्हणण्यात येत आहे.

दरम्यान, छापेमारीदरम्यान ईडीने आलिशान गाड्या, खोटी कोटेशन्स, फर्जी कागदपत्रे, नोंदी तसेच कर्जदारांनी खरेदी केलेली जमीन आणि इतर महागडी मालमत्ता जप्त केली. PMLA कलम 17 अंतर्गत ही सर्व जप्ती करण्यात आली आहे. अनेक आरोपींनी फसव्या कर्जातून मिळालेल्या रकमेचा उपयोग महागडी मालमत्ता आणि गाड्या खरेदी करण्यासाठी केल्याचेही समोर आले आहे.

या धाडीनंतर बँक व्यवस्थापन आणि वित्तीय संस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बँकेतल्या अंतर्गत यंत्रणेतील त्रुटी आणि पडताळणी प्रक्रियेतील दुर्लक्षामुळे एवढा मोठा घोटाळा कसा घडला, याबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!