आमदार यशवंत माने अडचणीत! जातीची खोटी कागदपत्रे घेऊन तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप…


Maharashtra Politics : राजकारण तोंडावर आले असून राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण बडा आमदार सीबीआयच्या कचाट्यात सापडला आहे.

आमदार यशवंत माने यांच्यावर एससी जातीची खोटी कागदपत्रे देऊन तीन पेट्रोल पंप घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी सीबीआय करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, यशवंत मानेंविरोधात १७ मे २०२२ रोजी मोहोळचे शिंदे गटाचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी तक्रार दाखल केली होती. यशवंत माने यांनी कॉलेज जीवनात विमुक्त जाती कॅटेगिरीतून शिष्यवृत्ती घेतली आहे. असा दावा तक्रारीत केला आहे.

तसेच बुलडाणा तालुक्यातील चिखली गावचा रहिवासी आहे. असे दाखवून एससी जातीचा बोगस दाखला आणि व्हॅलिडिटी काढली आहे. असेही तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सीबीआयने दखल घेतली असून लवकरच माने यांची चौकशी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!