SBI च्या ग्राहकांची होणार दिवाळी! आणली नवीन सेवा; होणार मोठा फायदा, जाणून घ्या…

पुणे : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेच्या ग्राहकांची संख्या कोटींच्या घरात आहे. बँक आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन सुविधा घेऊन येत असते. अशीच एक सेवा बँकेने आणली आहे. यासाठी ग्राहकांना फक्त आधार कार्ड गरजेचे आहे.
आधार कार्डचा नंबर वापरून ग्राहकांना आता सामाजिक सुरक्षा योजनांसाठी नावनोंदणी करता येणार आहे. त्यांना पासबुकची गरज पडणार नाही. याबाबत नुकतीच बँकेने माहिती दिली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजनांमध्ये ग्राहकांना सोप्या पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
या योजनांचे फायदे पुढील प्रमाणे…
या योजनांच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एका वर्षाची अपघात विमा योजना असून यामध्ये अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी संरक्षण मिळते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना देखील एक वर्षाची जीवन विमा योजना असून यामध्ये कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला तर संरक्षण मिळते. तसेच अटल पेन्शन योजनेत लाभार्थ्याला वयाच्या ६० वर्षांनंतर कमीत कमी एक हजार ते पाच हजार मासिक पेन्शन दिली जाते.
तसेच जून २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या बँकेकडे एकूण ४५.३१ लाख कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत. तसेच एसबीआयने ३३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वितरण केले आहे. जर तुम्हीही या बँकेचे ग्राहक असाल तर लगेचच बँकेने नव्याने सुरु केलेल्या सेवेचा लाभ घ्या.