उरुळी कांचनच्या उपसरपंचपदी सायली बडेकर बिनविरोध…

उरुळी कांचन : उरुळीकांचन (ता.हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सायली जितेंद्र बडेकर यांची सोमवारी (दि. ८ ) बिनविरोध करण्यात आली आहे. या कुटूंबियांकडे तिसऱ्यांदा गावची धुरा सांभाळण्याचा राजकीय योग आला आहे.

उपसरपंच स्वप्निशा कांचन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच ऋतुजा कांचन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.८) रोजी उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सायली जितेंद्र बडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुजा कांचन व ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांनी यांनी सायली बडेकर यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन, सरपंच ऋतुजा कांचन, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, दत्तात्रय कांचन, माजी उपसरपंच स्वप्निशा कांचन, संचिता कांचन, सीमा कांचन, अनिता बगाडे, अनिता तुपे, मिलिंद जगताप, यशवंतचे संचालक संतोष कांचन, जयप्रकाश बेदरे, काळूराम मेमाणे, युवा नेते अजिंक्य कांचन, भाऊसाहेब तुपे, आदी ग्रामस्थ व सदस्य उपस्थित होते.

आंबेडकर चळवळीचे दिवंगत नेते स्व. बाळासाहेब बडेकर यांच्या स्नुषा सायली बडेकर आहेत. तर त्यांच्या सासूबाई हेमलता बडेकर ह्या पंचायत समितीच्या माजी उपसभापती तर पती माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर यांनी गावची धुरा सांभाळली आहे. बडेकर कुटूंब हे राजकारणातील प्रस्थापित घराणे म्हणून सक्रिय राजकारणात आहे.