Savita Landge : लोणीकाळभोरच्या सरपंचपदी सविता लांडगे यांची बिनविरोध निवड.. !!


Savita Landge उरुळी कांचन : पूर्व हवेली तालुक्यात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या लोणीकाळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता गिताराम लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्वसाधारण सरपंचपदाच्या खुर्चीवर इतर मागासवर्गीय महिलेला सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाल्याने या निवडीने दुर्मिळ राजकीय योग घडून आला आहे.

लोणीकाळभोर चे मावळते सरपंच योगेश काळभोर यांनी आपल्या निर्धारीत वेळेत सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानेया रिक्त पदासाठी शुक्रवार(दि.१७)निवडणूक झाली. या निवडणूकीसाठी सविता लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी अशोक शिंदे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली आहे.

हवेली तालुक्यात लोणीकाळभोर ग्रामपंचायत ही अतिशय संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून संबोधली जात आहे. या ग्रामपंचायतीसाठी अतिशय चुरशीच्या वातावरणात निवडणूका संपन्न झाल्या आहेत. लोणीकाळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदा साठी मागील काळात मोठा रस्सीखेच सुरू असल्याचा अनुभव आहे.हवेली तालुक्याचे ज्येष्ठ नेते माधव काळभोर यांच्या ताब्यात गेली पंधरा वर्षे ही ग्रामपंचायत आहे.

या ग्रामपंचायतीवर सलग दुसऱ्यांदा सविता लांडगे निवडून आल्या आहेत. तर त्यांचे दिर सिताराम लांडगे यांनीही यापूर्वी सदस्यपद भूषविले आहे. सविता लांडगे यांची गत पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदाची संधी हुकल्याने त्यांना सर्वानुमते सरपंचपदी संधी देण्याचा झालेल्या निर्णयानुसार सविता लांडगे यांना संधी मिळाली आहे. Savita Landge

या निवडीप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर,माजी जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, शिवदास काळभोर ,उपसरपंच प्रियांका सचिन काळभोर , माजी सरपंच राजाराम काळभोर, माधुरी राजेंद्र काळभोर, ग्रा.प. सदस्य नागेश काळभोर, भरत काळभोर, गणेश कांबळे, सुनिल गायकवाड, ग्रा.पं. सदस्या ज्योती काळभोर, ललिता राजाराम काळभोर, रत्नाबाई राजाराम वाळके,संगीता सखाराम काळभोर , भारती राजाराम काळभोर व ग्रामविकास अधिकारी,एस.एन तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. गावच्या

विकासासाठी कटिबद्ध राहणार – सविता लांडगे

“मी गावच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी कटीबध्द असुन पुढील पंचवीस वर्षेचे नियोजन करुन पुणे शहराचे उपनगर म्हणून विकसित होत असलेल्या लोणी-काळभोरच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन, आरोग्य सुविधा, रस्ते, विज याचा चांगला आराखडा बनवुन योग्य नियोजन करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सविता लांडगे यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!