सातबारा दुरुस्ती प्रकरण आलं अंगलट! मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित….


पुणे : मुळशीचे तहसीलदार रणजीत भोसले यांना निलंबित करत शासनाने दणका दिला आहे. शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सातबारा दुरुस्ती करताना 85 वर्षांपेक्षा आधिकचा विलंब याबाबत विचार न करता अनियमितता केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, एका सातबारावर दि टाटा पॉवर कंपनी लि. या कंपनीचे नाव कमी करुन श्री. धोंडू गोपाल ढोरे यांचे नाव दाखल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी तहसीलदार भोसले यांनी मालकी हक्कामध्ये नाव दाखल करण्याचा आदेश केला होता. प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या रिट याचिकान्वये न्यायालयाने तहसीलदार यांनी पारित केलेला आदेश रद्द केला आहे.

त्यामुळे तहसीलदार मुळशी यांनी पारित केलेल्या निर्णयाची अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे स्तरावर चौकशी करण्यात आली. अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी मुळशीचे तहसीलदार भोसले यांचेकडून अनियमितता झाल्याचा अहवाल शासनास सादर केला होता. यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे. शासकीय कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता व औचित्य न ठेवल्याने कर्तव्यात कसूरी करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले.

दरम्यान, तहसीलदार रणजित भोसले यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील तरतुदी अन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्याचे प्रस्तावित केले आहे. या कारवाईमुळे पुणे जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक बडे अधिकारी पदाचा गैरवापर करत अनेक प्रकारे चुकीची कामे करत असल्याचे अनेकदा समोर येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!