सातारा ZP वाद चिघळला ; एकनाथ शिंदेनीं मंत्री-आमदारांची बोलावली तातडीची बैठक


मुंबई : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीवेळी झालेल्या गोंधळाचे पडसाद आता विधान परिषदेत उमटले आहेत.या प्रकरणावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे मंत्री आमने-सामने आल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. या वादाची गंभीर दखल आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या सर्व प्रकारावर संतप्त होऊन त्यांनी शिवसेनेच्या मंत्री खासदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमकं काय झालं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

साताऱ्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान पोलीस आणि लोकप्रतिनिधींमध्ये मोठा वाद झाला.यावरून विधान परिषदेत शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली.सातारा पोलीस अधीक्षक घरगड्यासारखे वागले, त्यांनी मंत्र्यांना धक्काबुक्की केली, असा खळबळजनक आरोप देसाई यांनी केला. यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

सातारा जिल्हा परिषदेच्या वादाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना मंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत एकनाथ शिंदेंनी बैठकीत घडल्या प्रकारावर संताप व्यक्त केला असल्याची माहिती समोर आली आहे. या वादावरून महायुती चांगलीच ठिणगी पडली आहे.

दरम्यान सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या या आदेशानंतर भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक होत या कारवाईला विरोध केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सातारा घटनेवर देखील भाष्य केले.तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी चौकशी होणार असल्याचे जाहीर केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!