Satara News : महाबळेश्वरमध्ये मोठी दुर्घटना! शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू..

Satara News : साताऱ्यातील महाबळेश्वर लगतच्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वाळणे ( ता महाबळेश्वर) गावात घडली आहे.
सोनाक्षी रामचंद्र सुतार (व १२), सोनाक्षी तानाजी कदम (वय १२) अशी मृत झालेल्या मुलींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, तापोळा भागातील दुर्गम वाळणे (ता. महाबळेश्वर) या गावातील या गावातील चार मुली काल शिवसागर जलाशयात खेळताना बुडाल्या. यावेळी गावकरी मंडळी जमा झाली. बुडत असलेल्या आर्या नलावडे हिला बाहेर काढले व पुन्हा पाण्यात उडी मारून सृष्टी नलावडे हिस बाहेर काढले. Satara News
त्यानंतर सोनाक्षी सुतार हिस बाहेर काढत आरडाओरडा केला. त्यामुळे धरणात असलेल्या मच्छिमार लोकांनी बोटीने येऊन सोनाक्षी कदमला पाण्यातून बाहेर काढले. यातील सोनाक्षी सुतारचा जागीच मृत्यू झाला, तर सोनाक्षी कदम हिला आरोग्य केंद्रात मृत घोषित करण्यात आले.
सृष्टी नलावडे हिच्यावर तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. आर्या नलावडे ही व्यवस्थित असल्याने घरी आहे. याबाबतची फिर्याद शुभांगी यांनी महाबळेश्वर तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.