Satara News : गाढ झोपेत असतानाच संकट ओढावलं! वाईत धोम धरणाचा कालवा फुटला, ऊस तोड मजुरांचे संसार उघड्यावर, बैलही गेले वाहून..
Satara News : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात शनिवारी (ता.१६) पहाटे मोठी घटना घडली. वाई तालुक्यातील ओझर्डी गावात धोम धरणाचा कालवा फुटल्याने संपूर्ण गावामध्ये पाणी शिरल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे पूर्ण गावांमध्ये पाणी शिरल्याची देखील माहिती मिळाली आहे. ओझर्डी गावात धोम धरणाचा कालवा फुटल्या नंतर संपूर्ण गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. यानंतर जवळपास १५० ऊसतोड मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे. Satara News
ऊसतोड मजुरांना या मधून बाहेर काढण्यात आले असले तरी त्यांच्या संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा कालवा फुटला आहे. यामुळे नदी नाल्यांना पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर रातोरात जवळपास १५० ऊसतोड मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र मजुरांचे संसार उघड्यावर पडले आहेत त्यांच्या संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. त्याचबरोबर २ बैल पुरामध्ये वाहून गेले असून १२ बैलांना वाचवण्यात यश आले आहे.