Satara News : महापुरुषांचा सोशल मीडियावर अवमान, साताऱ्यातील पुसेसावळी येथे दंगल; दोन गट भिडले, एकाचा मृत्यू..


Satara News सातारा : सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील पुसेसावळी शहरात सोशल मीडिया पोस्टवरुन दोन गटात राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेचे रात्री खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले. (Satara News)

यानंतर दोन गट आमने- सामने येत दगडफेकही झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. रविवारी (ता .१०) रात्री ९.३० च्या सुमारास सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे हा संपूर्ण प्रकार घडला.

मिळालेल्या माहिती नुसार, पुसेसावळी येथील एका माध्यम समूहावर महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाला होता. हा मजकूर एका विशिष्ट समुदायातील युवक प्रसारित करत असल्याच्या संशयावरून रात्री साडेनऊच्या सुमारास या समाजातील बहुसंख्य युवक पुसेसावळी बाजारात जमा झाले.

या युवकांनी विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाड्या, वाहनांना लक्ष्य करत दगडफेक सुरू केली. याच दरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकानांना आग लावण्यास सुरुवात केली. २ ते ३ हजार युवकांचा जमाव आक्रमकपणे जाळपोळ करत पुढे सरकत होता.

याबाबतची माहिती मिळताच सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रित आणली आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे साताऱ्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!