Satara News : सातार हादरलं!! निंभोरेत सख्या बहीण-भावाचा खून, भयंकर माहिती आली समोर…
Satara News : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याला हादरवून सोडणारी अक घटना घडली आहे. तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सीताबाई शिंदे (वय. ३२) व सुमित शिंदे (वय. १५) असे खून झालेल्या बहीण भावाचे नाव आहे.
ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सविस्तर माहिती अशी की, फलटण तालुक्यातील निंभोरे गावच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाचा मृतदेह आढळून आला. दोघांचा मृतदेह पाहताच काही नागरिकांनी याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. Satara News
घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून दोघांचेही मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. फलटण ग्रामीण पोलिसांकडून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.