सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण ; कधी? कोणत्या दिवशी? आणि किती वेळा झाला महिलेवर अत्याचार? खासदार वर्षा गायकवाडांचा मोठा गौप्यस्फोट


सातारा : डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या हत्येच्या आरोपांनंतर आता खासदार वर्षा गायकवाड यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.व्यवस्थेने डॉक्टर महिलेच्या मनात अविश्वासाची भावना निर्माण केली. त्या एक सशक्त महिला होत्या,पोलीस त्यांना वाचवतील अशी त्यांची अपेक्षा होती. पण पोलीस डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराचे कारण आहेत. पोलीसच भक्षक झाले तर, राज्याचे काय हाल होतील हे डॉक्टर महिलेच्या रुपात आपल्या समोर आले आहे.

पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला आणि तो गोपाळ बदनेने केला आहे. डॉक्टर महिलेवर पहिला बलात्कार 15 जून 2025 रोजी झाला. दुसरा बलात्कार 10 जुलै 2025 रोजी झाला. तिसरा बलात्कार 5 ऑगस्ट 2025 रोजी झाला… चौथा बलात्कार 20 सप्टेंबर 2025 मध्ये झाला. यादरम्यान डॉक्टर महिलेला ब्लॅकमेल आणि धमकावण्याचं काम करण्यात आलं. यामध्ये प्रशांत याचं देखील नाव समोर आलं आहे, ज्याने डॉक्टर महिलेचा मानसिक छळ केला. मारहाण आणि अपमानित केलं.. आत्महत्येबद्दल सांगायचं झालं तर, ही आत्महत्या नाही तर, हत्या आहे असं देखील त्या म्हणाल्या..

दरम्यान यावेळी वर्षा गायकवाड यांनी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला कारण घटनेच्या दोन दिवसांनंतर मुख्यमंत्री फलटण येथे गेले आणि सभेत त्यांनी रणजित निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याचं वक्यव्य केलं. त्यामुळे मुख्यमंत्री आता कोणाला पाठीशी घालत आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!