सातारा डॉक्टर महिला हत्या प्रकरण ; मुख्यमंत्री फडणवीसांचं पीडीतेच्या कुटुंबाला आश्वासन, मास्टरमाइंड शोधून काढू,सहआरोपी करून कठोर कारवाई…

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.या डॉक्टरच्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मोहन जगताप यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून कुटुंबाची मागणी त्यांच्या कानावर घातली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पिडीतेच्या कुटुंबाला या प्रकरणाचा मास्टरमाईंड शोधून काढण्याचं आश्वासन दिले, त्याचबरोबर त्याला सह आरोपी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही सांगितलं.

समोर आलेल्या माहितीनुसार, बीडच्या पीडित कुटुंबाला राष्ट्रवादीचे नेते मोहन जगताप शनिवारी भेटायला आले होते. त्यांनी कुटुंबाच्या समोर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन लावला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनेचा मास्टरमाइंड शोधण्याचे आश्वासन पीडित कुटुंबाला दिले.तसेच पीडितेच्या तक्रारीवर चौकशी न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होईल आणि जे कोणी या प्रकरणात असेल त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणीस यांनी पीडित कुटुंबाला फोनवरून दिले.

दरम्यान पीडित डॉक्टर महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरिष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले. तिने तळहातावर लिहिल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक बदाने याने वारंवार अत्याचार केले आणि बनकर याने तिचा मानसिक छळ केला. प्रशांत बनकर आणि पीडितेची चांगली मैत्री होती. प्रशांतच्या वडिलांच्या फ्लॅटमध्येच पीडिता राहायला होती. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रशांत आणि पीडितेमध्ये जोरदार भांडण झाले होते. अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता आणखीन काय धक्कादायक खुलासे येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

