अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात सरपंचाचा’ तो’ दावा; मिटकरींचा गौप्यस्फोट, घातपात असेल तर बदला…..

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघात प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या अपघातप्रकरणी प्रत्यक्ष दर्शनी लोकांनी विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होते असे सांगितले होते. या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जर दादांच्या मृत्यूचा कट रचला गेला असेल तर त्याचा बदला घेणारच असं म्हटलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले, अपघाताच्या घटनेच्या दिवशी सायंकाळी मी तिथे गेलो असता तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी मला विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहिलं होत. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी धावले पण पोहोचण्यापूर्वी विमानाचा स्फोट झाला असा दावा त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, दादांचा हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत या मृत्यूच गूढ उकलत नाही,तोपर्यंत जिवंत असेपर्यंत हा लढा देत राहील.जर दादांच्या मृत्यूचा कट रचला गेला असेल तर त्याचा बदला घेणारच असं त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या या विधानामुळे विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करणारी ती व्यक्ती कोण?तांत्रिक बिघाड की घातपात असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. या खुलाशानंतर आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी मागणी होत आहे.
