शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे हत्याकांडात मोठी अपडेट समोर…!
हल्लेखोरांनी आधी रेकी केली अन् नंतर....
पुणे : प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळमधील शिरगावच्या सरपंचांवर शनिवारी अज्ञात हल्लेखोरांनी धरादार शस्त्रांनी वार केल्याची घटना घडली होती. या घटनेत सरपंच प्रवीण गोपाळे यांचा मृत्यू झाला. या घटनेनं पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केले आहे. अटक केलेल्यामध्ये महेश भेगडे, अशोक कांबळे, मनिष ओव्हाळ, अमोल गोपाळे यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी भाऊ प्रवीण यांच्या हत्येप्रकरणी स्थानिकांवर संशय व्यक्त केला आहे. प्रवीण हे त्यांची दुचाकी घेऊन प्रति शिर्डी साईबाबा मंदिराच्या कडेला बसले होते. त्यावेळी दोन आरोपीेंनी येऊन त्यांची पाहणी केली त्यानंतर इतर दोन आरोपी दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांच्यावर कोयत्यासारख्या हत्याराने वार करून खून केला.