ब्रेकिंग! आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा, बलात्कार प्रकरणात दोषी…!


गांधीनगर : स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात त्यांना आता जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे.

आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. आसाराम बापूवर उत्तर प्रदेशच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आसारामच्या आश्रमात शिकत होती.

आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावले होते. त्यानंतर अनेकदा शारीरिक शोषण करण्यात आले. तसेच सुरत येथील आश्रमात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार झाला, असं लहान बहिणीने सांगितले होते.

तसेच मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. अनेकदा आपल्यावर बलात्कार झाला असल्याचे सांगितले गेले आहे.

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात आधीपासूनच आसाराम बापू हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम बापू या दोघांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!