संतोष देशमुख प्रकरण भोवणार! अखेर धनंजय मुंडे देणार राजीनामा, दोन दिवसात होणार निर्णय…


बीड : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचे आता समोर आले आहे.

त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आजपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याचे संकेत आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध समोर आल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.

तसेच राष्ट्रवादीतही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून दोन गट पडले असल्याची माहिती समोर आली होती. तर, दुसरीकडे करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार असल्याचे वक्तव्य करून रविवारी खळबळ उडवून दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!