मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला; खंडपीठाचा मोठा निकाल…

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने अवघा महाराष्ट्र हादरला. आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या वाल्मिक कराडने न्यायालयाकडे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता, आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी फेटाळला आहे.
संतोष देशमुख खून खटल्यात बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाल्मीक कराड यांनी आैरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. शुक्रवारी त्यांच्या जामीन अर्जावर ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी सहा तास प्रदीर्घ युक्तिवाद केला होता.

त्यांनी आपल्या युक्तिवादात सरकारपक्षाच्या वालमीक कराडची अटक व तपासाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. काल मंगळवारच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे मुख्यय्सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि फिर्यादी पक्षातर्फे ॲड. नितीन गवारे यांंनी आरोपींचे मुद्दे खोडून काढले होते.

बुधवारी सुनावणीवेळी आरोपीचे वकील यांनी सदर गुन्हयातील तपासाबाबत काही आक्षेप नोंदविले. त्यांनी न्यायालयास विनंती केली की, सदर प्रकरणाची दोष निश्चिती १९ डिसेंबरला असून, त्यांच्या दोष मुक्तीचा अर्ज उचच न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित आहे. तोपर्यंत कराड यांच्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याचे आदेश बीडच्या विशेष न्यायालयाला द्यावेत, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली.
उच्च न्यायालयाने सुनावणीअंती सदर प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याने सदर जामीन अर्ज मागे घेता की आदेश पारित करावा, असे कराडच्या वकिलांना केली. वकिलांनी आदेश करण्याची विनंती केली असता उच्च न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज जाहीर केला.
वाल्मीक कराडतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते, ॲड. संकेत कुलकर्णी यांनी तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सचिन सलगर यांनी सहकार्य केले. फिर्यादीतर्फे नितीन गवारे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. धनंजय पाटील यांनी सहकार्य केले.
