Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी माहिती, एका आरोपीला अटक, संजय शिरसाट यांचं महत्वाचं विधान…


Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण तापले आहे. या हत्या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला.

आता शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हे लोण दुसरीकडे पसरू नये, यासाठी या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे. याप्रकरणी आरोपीला अटक झाल्याचे समजते आहे. पण अद्याप याबद्दल स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मी याची आणखी परिपूर्ण माहिती घेत आहे. त्यानंतरच याबद्दल बोलेन, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. Santosh Deshmukh Case

हिवाळी अधिवेशन चालू असताना अनेक आमदारांनी बीडचा प्रश्न सभागृहात मांडला. मला कालच एकनाथ शिंदे साहेबांनी इकडे यायला सांगितले. मी आधी पोलिसांची भेट घेतली. संभाजीनगरहून इथे येत असताना मी सतत संतोषचे फोटो बघत होतो.

ते बघून माझ्या मनात चीड येत होती की इतक्या अमानुषपणे संतोषला कोण मारु शकतं. त्याच्या डोळे आणि पाठीवरचे वर्ण पाहिले. जर हे असेच वातावरण राहिले तर बीडमध्ये पुन्हा तीच दहशत निर्माण होईल, असेही संजय शिरसाट म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!