संजय राऊत डाकू आहे ,’ आमदार संतोष बांगरां’नी केली शिवीगाळ …!


मुंबई : विधीमंडळ चोरमंडळ असल्याची टीका संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपसह शिवसेना पक्ष विधानभवनात आक्रमक झाला आहे. त्यावर हक्कभंगाची कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया देत असतांना संतोष बांगर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. तसेच त्यांना शिवीगाळही केली आहे.

सभागृहातील कामकाज तहकूब झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी विधानभवन परिसरात घोषणाबाजीही केली. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत हा डाकू आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. तसेच त्यानंतर संजय राऊत यांना शिवीगाळ केली.

तसेच ते म्हणाले,  संजय राऊत आमच्या मतांवर निवडून येतो आणि आम्हालाच चोर म्हणतो. मला वाटतं हा संजय राऊत डाकू आहे. त्याच्यावर ३९५ कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा. संजय राऊत आम्हाला ज्या पद्धतीने चोर म्हणतायत. मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही त्यांनी चोर म्हटलं आहे. अशा ह***** महाराष्ट्रातली जनता फिरू देणार नाही

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!