बारामती पोटनिवडणुकीवर संजय राऊत यांचा मोठा दावा; शरद पवार यांच्या निर्णयाचा खुलासा…


बारामती : संजय राऊत यांनी नुकतीच जोरदार टीका करत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या पक्षानेही पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणूक लढवली होती, तीही लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर. मग लोकशाहीत कोणी निवडणूक लढत असेल तर त्यावर दबाव का आणला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राऊत यांनी पुढे सांगितले की, ते शरद पवार यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. त्या वेळी काँग्रेसच्या मदतीनेच ही निवडणूक लढवली गेली होती, हा अलिकडचाच इतिहास असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्यावरही त्यांनी टीका केली. हे काही स्वातंत्र्यसैनिक नाहीत की लोकांना समजावायला जातील. उलट धमक्या दिल्या जातात, फाईल्स दाखवल्या जातात. ‘निवडणूक लढू नका, नाहीतर कारखान्यांना नोटिसा पाठवू’ असा दबाव टाकला जातो, असा आरोप त्यांनी केला.

जे या धमक्यांना घाबरतात ते मागे हटतात. सध्याच्या राजकारणात काहीही सहज मिळत नाही, असे म्हणत राऊत यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर तीव्र भाष्य केले. आमच्या सद्भावना त्या कुटुंबाविषयी आहेत, तसेच अजित पवार यांच्याविषयीही आहेत, असे सांगत संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी कौटुंबिक कारणामुळे त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सद्भाSवना व्यक्त केल्या. मात्र, काँग्रेस हा महाविकास आघाडीतील स्वतंत्र पक्ष असल्याने, त्यांची भूमिका निवडणूक लढण्याची असेल तर त्यांनी उमेदवार देणे स्वाभाविक असल्याचेही राऊत यांनी नमूद केले.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसच्या भूमिकेबाबतही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, उमेदवार देताना काँग्रेसने एक अट ठेवली होती. “जर उमेदवारी मागे घ्यायची असेल, तर अजित पवार यांच्या संशयास्पद अपघाताबाबत राज्यात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

सध्या आकाश मोरे हे काँग्रेसचे उमेदवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीपासून दूर असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिवसेना या निवडणुकीपासून सध्या दूर असली, तरीही काँग्रेस हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या निर्णयाला वेगळे महत्त्व असल्याचेही राऊत यांनी अधोरेखित केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!