मोठी बातमी! संजय राऊत देणार भीमा सहकारी कारखान्याला भेट, राहुल कुल यांना मोठा धक्का…!
दौंड : पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. कारखान्याचे अध्यक्ष भाजपचे आमदार राहुल कुल यांनी पाचशे कोटीचे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
याबाबत सहकार बचाव समितीच्या वतीने खासदार राऊतांची मुंबई येथे भेट देऊन आभार मानले. तसेच समितीच्या मागणीचे निवेदन राऊत यांना देऊन कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळून देण्याचे आवाहन केले आहे. राऊत यांना भीमा पाटस कारखान्याला भेटीचे निमंञण दिल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी दिली आहे.
यावेळी राऊत यांनी संसदेचे अधिवेश संपल्यानंतर कारखान्याला भेट देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती ताकवणे यांनी दिली. यामुळे राऊत यांनी भेट दिली तर अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राऊतांंनी आरोप करून चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमिवर भीमा पाटस सहकार बचाव समितीने संजय राऊत यांनी मुंबई येथे भेट घेऊन आभार मानले आहेत. भीमा सहकारी साखर कारखाना थकीत कर्जामुळे सभासदांच्या मालकीचा कारखाना राज्य सहकारी बँकेने २५ वर्ष भाडेकरावर चालवायला देण्याची निविदा काढल्यापासून सहकार बचाव समितीने चौकशी करण्याची मागणी केली होती.