Sanjay Raut : बापाने नाक रगडलं, लाज वाटली… शिंदे पिता-पुत्रांबद्दल बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली


Sanjay Raut : चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन-वन इलेक्शनबद्दल बोलतात. खोटारडे कुठले, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरण्याची भिती आहे, म्हणून जास्त वेळ हवा आहे. लाडक्या बहिण योजनेचा आणखी एक हफ्ता लाच म्हणून द्यायचा आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, “माकडाच्या हाती मशाल दिली तर तो काय करणार?, यावर राऊतांनी प्रत्युत्तर देताना श्रीकांत शिंदेंना “रावणाची औलाद” असे संबोधले.

राऊतांनी श्रीकांत शिंदेंच्या डॉक्टरीच्या सर्टिफिकेटची सत्यता तपासण्याची मागणी केली. त्यांनी श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप करताना म्हटले, श्रीकांत शिंदे हा माकडाचा मुलगा आहे. त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरला आहे.

शिवाय, श्रीकांतला उद्धव ठाकरे यांनी खासदार बनवलं, नाहीतर त्याला याची लायकी नव्हती. त्याचा बाप माझ्याकडे काम मागायला आला होता. बेरोजगार आहे, डॉक्टर असूनही रुग्णालय चालवू शकत नाही. बापाने नाक रगडले, लाज वाटली पाहिजे, बेशर्म माणूस!” अशा खालच्या शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला. Sanjay Raut

दरम्यान, संजय राऊतांनी ‘लाडकी बहिण योजना’ बद्दल देखील जोरदार टीका केली. ही काही नवीन क्रांती नाही. याआधी सुद्धा महिलांसाठी अशा योजना आणल्या आहेत. मात्र, हे सरकार लोकांच्या कराच्या पैशातून योजना राबवत आहे. आमचं सरकार आलं, तर आम्ही महिलांना ३००० रुपये देऊ हा आमचा शब्द आहे, असे ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!