Sanjay Raut : संजय राऊतच खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, मुलीच्या अकाउंटवर घेतले पैसे, बड्या नेत्याने थेट अकाऊंट नंबरच वाचून दाखवला..


Sanjay Raut : संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसने पक्षातून निलंबित केलेले संजय निरुपम यांनी केला आहे. त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत असा धक्कादायक आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी थेट अमोल किर्तीकर आणि संजय राऊत यांच्यासोबत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

संजय निरुपम यांनी सांगितले की, शिवसेनेचे उमेदवाराला खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने बोलावले आहे. तपासानंतर ईडी काय करेल मला माहित नाही. पण कारवाई झाली पाहिजे असे मला वाटते. किती मोठा चोर किती बेईमान केली.

या घोटाळ्यावर काम करायला मी सुरुवात केली तर मास्टरमाईड कोणी वेगळाच आहे. राजकारणात कुटुंबाला आणणे योग्य नाही. पण खिचडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी संजय राऊत हेच मुख्य सूत्रधार आहेत. असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

राजकारणात कधीही कुटुंबाला खेचू नये. पण घोटाळा ज्याप्रकारे झाला आहे, त्यात त्यांचा उल्लेख करावा लागत आहे. संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पकडले गेल्यानंतर त्यांनी पत्नीच्या नावे लाच घेतल्याचे समोर आले होते.

त्यांनी पत्नीला मधे आणायला नको होते. खिचडी घोटाळ्यात त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीत राजीव साळुखे, सुजीत पाटकर हे संजय राऊतांचे पार्टनर आहेत.

कोविडमध्ये त्या कंपनीला ६ कोटी लाखांची खिचडी पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं. या कंपनीतून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंब, मित्रांनी १ कोटी रुपये दलाली म्हणून घेतले. बँकेतील खात्यातून मुलीच्या नावे संजय राऊतांनी चेकने लाच घेतली. २९ मे २०२० रोजी ३ लाख ५० हजार रुपये खात्यात आले होते. Sanjay Raut

२६ जून २०२०२ रोजी ५ लाख रुपये मिळतात. ६ ऑगस्टला १ लाख २५ हजार, २० ऑगस्टला ३ लाखांचा एक चेक येतो. याचदरम्यान संजय राऊतांचे सख्खे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यावर ६ ऑगस्टला ५ लाखांचा चेक मिळाला, असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.

३५ रुपयात ३०० ग्रॅम खिचडी पुरवठा कऱण्याचं कंत्राट सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीला मिळाले होते. कोविडमध्ये सगळीकडे हाहाकार माजला होता. सगळं काही बंद पडलं होतं. अशावेळी हतबल लोकांना खिचडी पुरवण्याचा कंत्राट पालिकेने कंपनीला दिले होता.

पण नंतर १६ रुपयात १०० ग्रॅम खिचडी देण्याचं कंत्राट दिले जाते. म्हणजे २०० ग्रॅम खिचडी चोरण्यात आली. म्हणूनच फक्त उमेदवार (अमोल कीर्तिकर) नाही, तर संजय राऊतही खिचडी चोर आहेत. त्यांनी पैसे खाल्ले आहेत. कंपनीत कदम नावाचा व्यक्ती नसताना, करारात मात्र त्याचाच उल्लेख आहे, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!