Sanjay Raut : एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने उडाली खळबळ….

Sanjay Raut : १९ जून २०२२ रोजी शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा झाला होता. त्याच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे २१ जानेवारी २०२२ रोजी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वांत मोठे बंड झाले. एकनाथ शिंदे शिवसेनेतून ४० आमदारांना फोडून भाजपसोबत गेले होते.
आता शिवसेना फुटीवेळी शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना गुंगीचं औषध दिले होते, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी याआधी ‘मला इंजेक्शन देऊन सुरतला नेले होते आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, दावा केला होता. यानंतर आता संजय राऊत यांनी दावा केला आहे. संजय राऊत हे आज धुळे दौऱ्यावर आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर आरोप केला आहे. Sanjay Raut
संजय राऊत म्हणाले की, सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्या अनेक आमदारांना खाण्यातून गुंगीचे औषध दिले गेले. नितीन देशमुख यांना मारण्याचा प्रयत्न झाला ते हॉस्पिटलमधून परत आले. काही आमदार हे पाच-सहा दिवस विशिष्ट प्रकारच्या गुंगीत होते. त्या हॉटेलच्या किचनचा ताबा या लोकांनी घेतला होता.
आमदारांचे म्हणणे होते की, आम्हाला खाण्यातून आणि पेयाद्वारे काही तरी दिले जात होते. सात-आठ दिवस आम्हाला काहीच कळले नाही. हे सिद्ध करण्यासाठी आमचेकडे पुरावे नाहीत. पण त्यावेळी आमदारांशी बोलताना आम्हाला जाणवायचं की, त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही. ते गुंगीत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.