Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना ती चूक नडली, गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना रोखठोक भाष्य भोवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अक्षेपार्ह लिखान केल्यावरुन संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकत्याच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारानंतर भारतीय जनता पार्टीला तीन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळाले.
या विजयाचे विश्लेषण संबंधी लेख सामना दैनिकाचे संपादक तसेच खासदार संजय राऊत यांनी ‘दैनिक सामना’ या वृत्तपत्रात १० डिसेंम्बर २०२३ला ‘रोखठोक’ सदरात प्रसिद्ध केले. या लेखात पंतप्रधान पदावर असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरुद्ध आक्षेपार्ह व प्रक्षोभक असे विधान केले असल्याचा आरोप भाजप नेकेला आहे. Sanjay Raut
याप्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतड यांनी संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली होती. ‘सामना’ या वृत्तपत्रातून देशविरोधी वक्तव्य करून देशद्रोहाचा गुन्हा करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याचा आरोप भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केला होता. इतकेच नाहीतर या तक्रारीवरून संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.