Sanjay Raut : भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत का? घड्याळाची साथ सोडणार, संजय राऊतांनी दिली महत्वाची माहिती…


Sanjay Raut : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती. राज्यात याची चर्चा देखील जोरदार सुरु आहे.

यावरआता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कालपासून ही अफवा जोरात चाललेली आहे, की भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, ते कोणत्या वाटेने येत आहेत ही वाट काय आम्हाला दिसलेली नाही.

छगन भुजबळ हे एकेकाळी शिवसेनेत होते, त्याला एक कालखंड झाला आहे, जमाना झाला आहे. छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेले, शरद पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादीत गेले, आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत असा त्यांचा मोठा प्रवास आहे.

त्या प्रवासात शिवसेना आता खूप मागे राहिलेली आहे आणि महाराष्ट्रात राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेलेली आहे, त्या बातमीत आणि अफवांमध्ये कोणतंही तथ्य नाही. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद नाही, चर्चा नाही, होण्याची शक्यता नाही. Sanjay Raut

आता त्यांनी स्वतःचा मार्ग निवडलेला आहे त्यांची एक वेगळी भूमिका आहे, त्यांची भूमिका आणि शिवसेनेची भूमिका आता मेळ खाणार नाही. अशा प्रकारच्या बातम्या पेरून, अफवा पसरवून महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या गोंधळ उडवायचा असेल, त्यापलीकडे अशा बातम्यांना आम्ही जास्त काय महत्त्व देत नाही, असं राऊत यांनी म्हंटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!