Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी, शिक्षा सुनावल्यानंतर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, आम्ही….


Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहेत. माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा हा खटला दाखल केला होता.

याप्रकणी आता संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, ज्या देशातील मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे आमच्यासारख्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. आज न्यायालयाने जो निर्णय दिला मी त्या निर्णयाचा आदर करतो असे ते म्हणाले.

अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आल्यानतंर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रकरणी आम्ही वरच्या न्यायलयात अपील करू, सेशन कोर्टात जाऊ असं त्यांनी नमूद केले आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

मीरा-भाईंदर भागात युवक प्रतिष्ठा संस्थेला काही शौचालय बनवण्याची काम मिळाली. त्यामध्ये घोटाळा झाला असा आरोप मी केला नाही. तर असा आरोप सर्वात आधी तर मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी लावला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले होते.

याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका तेथील आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली होती. त्यावर विधानसभेत चर्चाही झाली. याप्रकरणी एक आदेशही पारित करण्यात आला . यात मी अब्रुनुकसानी करण्याचा संबंध कुठे आला, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!