Sanjay Raut : शांत झोपेसाठी हर्षवर्धन पाटील भाजपात गेलेले अन् आता….; संजय राऊत यांची हर्षवर्धन पाटील यांच्यावर कोपरखळी


Sanjay Raut : इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गट राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांवर अखेर काल शिक्कामोर्तब केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल भाष्य केलं. या पत्रकार परिषदेवेळी हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.

दरम्यान, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रामराम करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. भाजपा प्रवेशानंतर ते प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले होते की आता मला शांत झोप लागते. मात्र पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत परत जाणार आहेत. पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे.

यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पाटील यांना शांत झोप लागण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी ‘नो कॉमेंट्स’ असं म्हणत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. तर दुसरीकडे, हर्षवर्धन पाटील यांना भाजपात शांत झोप लागली नसावी, मात्र आता ते महाविकास आघाडीत येत आहेत. त्यामुळे इथून पुढे त्यांना शांत झोप लागेल. याची खात्री देतो, असं वक्तव्य शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. Sanjay Raut

राऊत म्हणाले, हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश हा शरद पवारांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. त्यावर मी न बोललेलं बरं. हर्षवर्धन पाटील हे भाजपात गेले तेव्हा आम्हा सर्वांना धक्का बसला होता. शांत झोप लागावी म्हणून ते तिकडे गेले होते. मात्र, तिकडे त्यांची शांत झोप लागली नसावी. परंतु, आता ते ज्या ठिकाणी येत आहेत.

म्हणजेच महाविकास आघाडीत येत आहेत, इथे त्यांना शांत झोप लागेल. आम्ही त्यांना खात्री देतो की महाविकास आघाडीत आल्यावर त्यांना व त्यांच्यासारख्या इतर नेत्यांना शांत झोप लागेल, सुखाने झोप मिळेल. ते या पुढे चिंतामुक्त जीवन जगतील. महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी ते परत आले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो. असे ते म्हणाले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!