Sanjay Raut : एकनाथ शिंदे मौलानाचा वेश धारण करून अमित शाहांना भेटायचे, खासदाराचा खळबळजनक दावा!
Sanjay Raut : एकनाथ शिंदे वेश बदलून दिल्लीत जायचे. ते मौलानाच्या वेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यायचे, असा खळबजनक दावा शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे वेगळ्या विमानतळावरून जेव्हा-जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत, तेव्हा-तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत. त्यांना दाढी आहेच. पण माझ्या माहितीनुसार नाव बदलून ते मौलवीच्या वेशात दिल्लीला गेल्याची माझ्याकडे माहिती आहे. त्यांना मौलवीचा वेश शोभतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. Sanjay Raut
एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली आहे. ते स्वत:ला आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवत असले तरी ते दिल्लीला अनेकदा मौलवीच्या वेषात गेलेले आहेत. ते नाव बदलून दिल्लीत अमित शाह यांना भेटले. अजित पवार हेदेखील वेशांतर करून दिल्लीत येतात.
त्यांना दोन्ही विमानतळावर कोणी रोखत नाही. एकनाथ शिंदे नाव बदलून वेश बदलून दिल्लीत येतात. त्यांनाही कोणी रोखत नाही. याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवले आहेत. पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड आदी त्यांनी बनावट कागदपत्रे बनवली आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला आहे,