Sanjay Raut : छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच!! ठाकरे गटाच्या नेत्याची बोचरी टीका…


Sanjay Raut : शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी छगन भुजबळांवरही निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी राज्य सरकारच्या योजनेवरून लाडकी बहिण योजनेवरून जोरदार निशाणा साधला आहे.

छगन भुजबळांवर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. येत्या काळात कळेलच पवार साहेब काय आहेत.

भुजबळ मोठे कलाकार आहेत. त्यांनी सिनेमातही कामे केले, ते नाट्य देखील निर्माण करतात. छगन भुजबळ हे राजकारणातला फिरता रंगमंच आहेत. विधानसभेच्या जागावाटपाचे काहीही ठरलेले नाही. Sanjay Raut

लाडकी बहिण योजनेवर संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले,लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागला आहे. त्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही. खर तरं बहिणीला जास्त मदत मिळायला हवी.

बहिण घर चालवत असते, स्त्री पुरूष समानता असायला हवी. दिड हजारात काय होतंय?, किमान १० हजार तिलाही द्यायला हवेत. परवा सगळे लाडके भाऊ भरतीकराता जमा झालेले पाहायला मिळाले. भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी. असे ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!