ब्रेकिंग ! संजय राऊतांचा भीमा पाटस कारखान्यावर ५०० कोटींचा लॅंडरींगचा लेटरबॉम्ब, आता फडणवीस कारवाई करणार…?
पाटस : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले आहे.
यामुळे आता याची चौकशी करा अशी मागणी केली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विटरवर ट्विट करत आज सकाळीच राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत भिमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती घ्या, असाही सल्ला खासदार राऊत यांनी केला आहे.
सोमय्या यांच्या कार्यालयात तक्रारदार हे प्रकरण घेऊन गेले, मात्र किरीट सोमय्या या भ्रष्टाचारावर मूग गिळून गप्प बसले, जनतेच्या पैशाची प्रचंड लूटमार या कारखान्यात झाली आहे, हे सर्व प्रकरण ईडी व सीबीआयच्या ताब्यात देऊन भिमा सहकारी साखर कारखान्यातील घोटाळेबाजांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याने गेल्या काही वर्षात केलेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण हे सरळसरळ ५०० कोटींचे मनी लॅंडरींग असल्याचा आरोप केला आहे. या कारखान्यातील शेकडो कोटींचा गैरव्यवहार यापेक्षा भयंकर आहे, मात्र या भ्रष्टाचारास राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.