Sanjay Jagtap : आमदार संजय जगताप यांची मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार, नेमकं प्रकरण काय?


Sanjay Jagtap : पुण्यातील हवेली मतदारसंघामधील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक २४ जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. परंतु या बैठकीवरून राजकारण चांगलंच तापले आहे.

राज्यात कोणत्याही भागात ग्रामसभा, आमसभा जारी केली असेल तर कोणत्याही शासकीय बैठकीचे आयोजन करण्यात येत नाही. तरी देखील मुख्यमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन माजी राज्यमंत्री यांच्या सांगण्यावरून आयोजन केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विशेष अधिकार भंगाची नोटीस आमदार संजय जगताप यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली आहे.

आमदार संजय जगताप म्हणाले, आमसभा आयोजित केली असता त्या मतदार संघाबाबत इतर कोणत्याही शासकीय बैठकीचे आयोजन करू नये, अशी परंपरा आहे. परंतु माजी राज्यमंत्री यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक उल्लंघन करण्याचा प्रकार या माध्यमातून केला आहे. Sanjay Jagtap

ही बाब संसदीय लोकशाहीसाठी पूर्णपणे घातक असून, स्थानिक जनतेतून निवडून आलेल्या विधानसभा सदस्याचा व विधानसभेच्या सार्वभौम सभागृहाचा अवमान करणारी ठरते. त्यामुळे तो विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो.

पुरंदर विधानसभा क्षेत्राचे आमसभा झाल्यानंतर बैठक घ्यावी. असेही आमदार यांनी सांगितले होते. परंतु तसे मुख्यमंत्री यांनी केले नाही. हा तर एक प्रकारचा लोकशाहीचा खून आहे. असेही जगताप यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पुरंदरच्या जनतेची माफी मागावी. या आमसभेत मोठ्या प्रमाणावर सामान्य माणसांचे प्रश्न सुटावेत यासाठी महत्त्वाच्या प्रश्नांचे ठराव करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अधिकारी या प्रश्नाचा निपटारा करतील अशी खात्री यावेळी आमदारांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!