Sandeep Bhondve : आमदार अशोक पवार यांनी भूमिपूजन केलेला फलक काही वेळातच काढला! फुकटचे श्रेय घेऊन देणार नाही- संदिप भोंडवेंचा इशारा


Sandeep Bhondve उरुळीकांचन : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून येवलेवस्ती (पेरणे) ते बकोरी व लोणीकंद ते डोंगरगाव या रस्त्याचे भूमिपूजन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते आज करताच भाजप कार्यकर्त्यांनी झालेल्या प्रकाराचा खेद व्यक्त करीत भूमिपूजनाचा फलक काढला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फलकावर नाव असल्याने तो फलक सन्मानपूर्वक काढल्याची कृती भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

येवलेवस्ती (पेरणे) ते बकोरी व लोणीकंद ते डोंगरगाव या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आ.अशोक पवार यांनी मंगळवारी (ता.६) रोजी दुसऱ्यांदा या कामाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपचे पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संदिप भोंडवे यांनी करुन फुकटचे श्रेय लाटणाऱ्या अशोक पवार यांचा फलक कार्यक्रम झाल्यानंतर काढून टाकण्याची इशारा त्यांनी दिल्यानंतर भूमिपूजन कार्यक्रम झाल्यानंतर हा फलक काढण्यात आला आहे. Sandeep Bhondve

भोंडवे म्हणाले, १६ सप्टेंबर २०२३ रोजी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव , भाजपा विधानसभा प्रमुख प्रदीप कंद व पै.संदीप भोंडवे , विपुल शितोळे व शामराव गावडे ,पेरणे गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते झाले होते.

तसेच हा निधी तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माजी खासदार शिवाजी आढळराव यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वर्ग करण्यात आला होता. या रस्त्यांचे भूमिपूजन होऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असतानाही अशोक पवार यांना फुकटचे कामाचे श्रेय घेण्यात मोह येऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अशोक पवार यांनी पुन्हा एकदा चुकीच्या पध्दतीने या रस्त्याचे भूमिपूजन केले.

या रस्ताला तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून निधी मिळाला असताना आमदार अशोक पवार यांनी आज उद्घाटन केलेल्या फलकावर जाणीवपूर्वक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील टाकले नाही म्हणुन हवेली तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेधही व्यक्त केला आहे.

या वेळा भाजपा क्रीडा आघाडी प्रदेशाध्यक्ष पै.संदीप भोंडवे, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सातव , पुणे जिल्हा महीला मोर्चा अध्यक्ष पुनम चौधरी, पुणे जिल्हा भाजपा सचिव प्रदिप सातव, भाजपा हवेली तालुका अध्यक्ष शामराव गावडे, शिवसेना तालुका प्रमुख विपुल शितोळे, भाजपा हवेला तालुका सरचिटणीस गणेश चौधरी, दीनेश झांबरे व भाजपा व शिवसेना तालुका संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!