पवार कुटुंबीयांच्या घरी सनई चौघडे!रेवती आणि सारंग विवाहबद्ध होणार… खुद सुप्रिया सुळेंनी दिली गुड न्यूज..

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नातं आणि खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवतीचं लवकरच ‘शुभमंगल’ होणार आहे. रेवती सुळेचं वागपूरच्या सारंग लखानी यांच्याशी लग्न ठरलं आहे पवार किंवा सुळे कुटुंबाकडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.मात्र आता खुद्द वधू माय, म्हणजेच सुप्रिया सुळे यांनीच अधिकृत पोस्ट करत ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केल आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रेवती आणि सारंग यांचा फोटो टाकत त्यांचा विवाह ठरल्याची माहिती सर्वांना दिली. त्याोबतच त्यांनी सारंग लखानी यांचे काही फोटोही शेअर केले आहेत. ‘ अतिशय आनंदाने आम्ही हे सांगू इच्छितो की आमची लेक रेवती हिचं वंदना आणि अरूण लखानी यांच्या मुलाशी, सारंगशी लग्न ठरलं आहे’ अशी कॅप्शन लिहीत सुप्रिया सुळे यांनी थोड्या वेळापूर्वीच ही पोस्ट शेअर केली आहे.
कोण आहेत सारंग लखानी ?

खासदार सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी हे व्यवसायिक आणि उत्तम बॅडमिंटनपटू तथा विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे ते पुत्र आहेत. सारंग हेही एक उत्तम बॅडमिंटनपटू आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील सहभाग घेतलेला आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने लग्न ठरल्याची माहिती देखील समोर आली होती. रेवती व सारंगंच लग्न ठरल्यावर चाहत्याकडून अभिनंदन करत या जोडप्याला शुभेच्छाही देण्यात येत आहेत.