Sana Khan Murder Case : भाजप नेत्या सना खान हत्याकांडप्रकरणात मोठी माहिती आली समोर, विहिरीत सापडलेला मृतदेहाचा..


नागपूर : भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान (Sana Khan Murder Case) यांची २ ऑगस्ट रोजी हत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून अमित शाहुला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. २ ऑगस्ट रोजी सनाची हत्या करून तिचा मृतदेह जबलपूरच्या हिरेन नदीत फेकल्याची माहिती आहे. मुख्य आरोपीने सनाची हत्या केल्याची कबुली दिली. (Sana Khan Murder Case)

पप्पू साहूने सना खानचा मृतदेह हिरेन नदीत फेकून दिला, जिथे तो ३ किमी अंतरावर नर्मदा नदीला मिळतो. हा मृतदेह हिरेन नदीतून वाहत नर्मदा नदीत आल्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांना अजूनही सनाचा मृतदेह सापडलेला नाही.

ज्याखाली विहिरीत सापडलेला मृतदेह सना खानचा नाही. डीएनए चाचणीच्या अहवालातून याची पुष्टी झाली आहे. यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागला की सनाचा मृतदेह गेला कुठे? , असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

सनाच्या मृतदेहाचा शोध घेत असताना पोलिसांना हिरेन नदीच्या काठावरील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आला. विहिरीतून सापडलेल्या मृतदेहाचे कपडे सनाने शेवटच्या दिवशी घातलेल्या कपड्यांशी जुळतात. त्यामुळे हा मृतदेह सनाचा असल्याचा संशय पोलिसांना होता.

मात्र सनाच्या कुटुंबीयांनी हा मृतदेह सनाचा नसून डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यासाठी स्थानिक न्यायालयाची परवानगी घेऊन मृतदेहाचे नमुने घेण्यात आले. ते तपासासाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. डीएनए चाचणीसाठी पोलिसांनी सनाची आई मेहरुनिसा हिच्या रक्ताचे नमुने घेतले होते.

दरम्यान, अमित साहूने पत्नी सना खान यांची हत्या पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. त्याने पत्नीकडून 50 लाख रुपये पार्टनरशिपसाठी घेतले होते

. सना खान यांनी हे पैसे परत मागताच त्यांच्यात टोकाचा वाद झाला होता. अमितने रागाच्या भरात लोखंडी रॉड सना खान यांच्या डोक्यात घातला आणि मृतदेह नदीमध्ये फेकून दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!