Samsung Galaxy : आता मार्केटमध्ये होणार राडा! सगळ्यांचे लक्ष लागलेला Samsung Galaxy M35 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत…


Samsung Galaxy : Samsung चे सगळेच फोन आता iphone ला टक्कर देतात. आयफोनच्याच किंमतत सॅमसंगच तगडे फोटो मार्केटमध्ये आहेत. तुम्हालाही सॅमसंगचा फोन घ्यायचा आहे पण बजेट कमी आहे. घाबरू नका कारण Samsung Galaxy M35 5G भारतात लॉन्च झाला आहे.

कंपनीने या फोनचे जागतिक स्तरावर पदार्पण केले होते, परंतु आता तो भारतातही लॉन्च केला आहे. हा सॅमसंगचा मिडरेंज 5G स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आणि भौमितिक पॅटर्न डिझाइनसह आकर्षक बॅक पॅनल आहे.

हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ संरक्षणासह येतो, ज्यामुळे तो स्क्रीनची ताकद वाढवतो. या फोनचे स्पेसिफिकेशन्स आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगत आहोत. Samsung Galaxy

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.6-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो फुल एचडी+ रिझोल्यूशन, 2340×1080 पिक्सेल, 120Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्सचा पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षणासह येतो.

प्रोसेसर: या फोनमधील प्रोसेसरसाठी Samsung Exynos 1380 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो ग्राफिक्ससाठी Mali-G68 MP5 GPU सह येतो.

बॅक कॅमेरा: या फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे, जो OIS सपोर्टसह येतो. त्याचा दुसरा कॅमेरा 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो आणि तिसरा कॅमेरा 5MP मॅक्रो लेन्ससह येतो. या फोनमध्ये 30fps दराने 4K रेकॉर्डिंगची सुविधा देखील आहे.

फ्रंट कॅमेरा: सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी कंपनीने या फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

सॉफ्टवेअर: यामध्ये Android 14 वर आधारित OneUI 6.1 वापरण्यात आला आहे.

बॅटरी आणि फास्ट चार्जिंग: सॅमसंगने या फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल डीआयएम, ५जी, ४जी एलटीई, वायफाय ६, ब्लूटूथ ५.३, जीपीएस, एनएफसी सपोर्ट आहे.

कलर्स: हा फोन मूनलाइट ब्लू, डेब्रेक ब्लू आणि थंडर ग्रे कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

कंपनीने Samsung Galaxy M35 5G तीन प्रकारात सादर केला आहे.

पहिला प्रकार: 6 GB+128GB – १९,९९९ रुपये
दुसरा प्रकार: 8GB+128GB – २१,९९९ रुपये
तिसरा प्रकार: 8GB+256GB – रु. २४,९९९ …

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!