Sameer Wankhede : मोठी बातमी! समीर वानखेडे आता विधानसभा निवडणूक लढवणार, पक्ष आणि मतदारसंघही ठरला, जाणून घ्या…


Sameer Wankhede : महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महसूल सेवेचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

ते महायुतीकडूनही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील विधानसभेच्या जागेवरून समीर वानखेडे निवडणूक लढवणार आहेत.

समीर वानखेडेचा कोणता पक्ष?

विधानसभा निवडणुकीत समीर वानखेडे हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून समिर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धारावी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित मतदारसंघ आहे.

या मतदारसंघातून समिर वानखेडे यांच्या नावाची चाचपणी शिवसेनेकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. धारावी मतदारसंघात मुस्लिम मतदारांचेही प्रमाण चांगले आहे. त्याचा फायदा समीर वानखेडे यांना होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, समीर वानखेडे आयआरएस अधिकारी आहेत. समीर वानखेडे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्यावर त्याची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!