Sambhajiraje Chhatrapati : मोठी बातमी! ५ दिवसांपासून संभाजीराजे नॉट रिचेबल, कुटूंबालाही माहिती नाही, उलटसुलट चर्चा सुरू…


Sambhajiraje Chhatrapati : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती मागच्या ५ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. संभाजीराजे नेमके कुठे आहेत? याचा कुटुंबालाही थांगपत्ता नाहीये. तीन फेब्रुवारीला संभाजीराजे यांच्या हस्ते कोल्हापुरातील विकासकामांचं उद्घाटन होणार होतं. त्यांचा नियोजित दौरा होता.

तसेच २ फेब्रुवारीला संभाजी राजे छत्रपती यांनी एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहेत.

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात संभाजीराजे चाचपणी करत आहेत. ते दौरे करत आहेत. संभाजीराजे या मतदारसंघातून तयारी करत आहेत. अशातच महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची चर्चा होते आहे. शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापूर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे हे नॉटरिचेबल आहेत. Sambhajiraje Chhatrapati

संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत. संभाजीराजे यांच्या राजकीय भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात सध्या चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, यावर आता संभाजीराजे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे”, अशी संभाजी राजे छत्रपती यांची फेसबुक पोस्ट आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!