Samarjit Ghatge : कागलचा पुढचा आमदार मीच, समजीत घाटगे यांचं वक्तव्य, शरद पवार गटात जाणार?
Samarjit Ghatge : कागलमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आलेले दिसून येत आहे. या मतदारसंघातून महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपाचे नेते समरजीत घाटगे या दोघांपैकी एक संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आतापासूनच मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष उसळून आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांत उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली असून वरिष्ठ नेत्यांवर आतापासूनच दबावतंत्र सुरू असल्याचे चित्र आहे.
अशातच समरजीत घाटगे यांच्याविरोधात माध्यमातून सुरू असलेल्या बातम्यांमुळे कागलमधील राजकारण ढवळून निघाले आहे. घाटगे यांच्याशी राष्ट्रवादी शरद पवार गटाने संपर्क केल्याची माहिती समोर आल्यानंतर घाटगे यांनी ही माहिती खोडून काढली आहे. Samarjit Ghatge
भाजप नेते समरजीत घाटगे म्हणाले की, मी महायुतीतच आहे. माझ्याबद्दल काहींकडून खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. येणा-या विधानसभा निवडणुकीत कागलमधून मीच आमदार होणार आहे, असा विश्वास व्यक्त करत माझी तयारी पूर्ण झाल्याने काहींच्या पोटात गोळा आला आहे. वेळप्रसंगी अपक्ष लढू पण इतर ठिकाणी जाणार नाही.