Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी, दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, पोलिसांकडून तपास सुरू…

Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी आली असून त्यात धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली आहे. धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. हे पैसे नाही मिळाले तर सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.’
मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज मिळाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. अशाच पद्धतीचा धमकीचा मेसेज ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी मिळाला होता. त्यातही सलमान खानकडून पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप नंबरवर हा धमकीचा मेसेज मिळाला होता. Salman Khan
वाहतूक पोलिसांना मंगळवारी याबाबत संदेश प्राप्त झाला आहे. आरोपीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असून दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली. यापूर्वीही सलमानला अशा प्रकारे धमकी देण्यात आली होती.
दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर धमकीचा संदेश आला असून संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.