Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबाबत धक्कादायक माहिती आली समोर, तपासात सगळंच झालं उघड….


Salman Khan : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांची मोठी यंत्रणा तपासाच्या कार्याला लागली आहे. याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात गँगस्टर विशाल उर्फ ​​कालूचे नाव पुढे येत असल्याचे चित्रही समोर आले आहे. याच विशाल उर्फ ​​कालूने गेल्या महिन्यात रोहतकमध्ये गुरुग्राममधील भंगार व्यापारी सचिनची हत्या केली होती.

विशाल हा परदेशात असलेल्या रोहित गोदारासाठी काम करतो आणि सचिन खून प्रकरणही विशालने रोहित गोदाराच्या सांगण्यावरून घडवून आणले होते. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांचे छायाचित्र समोर आले आहे.

एक हल्लेखोर काळ्या आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये तर दुसरा लाल टी-शर्टमध्ये दिसत आहे. या छायाचित्राच्या आधारे दोघांचा शोध सुरू आहे. दोन्ही शूटर्सबाबत केंद्रीय यंत्रणांना महत्त्वाचे सुगावा मिळाले आहेत. Salman Khan

गॅलेक्सी येथे गोळीबार झाल्यानंतर लगेचच मुंबई पोलीस सक्रिय झाले आणि फॉरेन्सिक टीम गॅलेक्सी येथे पोहोचली आणि गॅलेक्सी अपार्टमेंटच्या भिंतींवर असलेल्या गोळ्यांच्या खुणा तपासल्या.

दरम्यान सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानं मुंबईसह बॉलिवूडही हादरले आहे. या घटनेवरुन विरोधक गृहखात्यावर निशाणा साधत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!