Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात आता महत्वाची माहिती उघड, शूटर सागर पाल….
Salman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच या हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा करण्यात आली आहे.
याप्रकणी आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. यामध्ये मुंबई गुन्हे शाखेने आरोपी सागर पालचा भाऊ सोनू पाल याचीही चौकशी केली. वास्तविक, पोलिस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, दुचाकीवर मागे बसलेल्या हल्लेखोर सागर पाल याने गोळी झाडली होती.
तर दुसरा आरोपी विकी गुप्ता हा दुचाकीवरून जात होता. दुचाकी चालवत असताना विकी लॉरेन्स टोळीच्या संपर्कातही होता. याशिवाय आरोपी सामान्य कॉलऐवजी इंटरनेट कॉलद्वारे संपर्क साधत असल्याचेही समोर आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, शूटर सागर पालचा भाऊ सोनू पाल हरियाणात काम करतो. गोळीबाराच्या घटनेदरम्यान तो त्याचा भाऊ सागर पाल याच्याशी फोनवर सतत संपर्कात होता. त्याचबरोबर सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी आणखी एका संशयिताला हरियाणातून ताब्यात घेण्यात आले आहे. Salman Khan
कुख्यात गुंड अनमोल बिश्नोईच्या कथित कटाची अधिक माहिती गोळा करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने चार पथके नवी दिल्ली, बिहार, गुजरात आणि राजस्थान येथे पाठवली आहेत.
बिश्नोई हा अटक करण्यात आलेल्या शार्पशूटर सागर पाल आणि विकी गुप्ता यांच्याशी इंटरनेट कॉलिंगद्वारे थेट संपर्कात होता. अशी माहिती समोर आली आहे.