Salman Khan : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत दोस्ती, धक्कादायक माहिती आली समोर…


Salman Khan : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मागच्या आठवड्यात धमकी आली होती. ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअपवर ही धमकी देण्यात आली होती. या व्यक्तीचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

तसेच सलमान खानच्या घरासह शूटिंगच्या वेळी सेटवरही तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी हत्या आणि सलमान खान धमकी प्रकरणाला पोलिस कसून तपास करत आहे. याआधी सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आला होता. या प्रकरणाचाही तपास सुरु आहे.

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. नवी मुंबई आणि मुंबई पोलिस या प्रकरणात सखोल चौकशी करत आहेत.

सलमान खान गोळीबार प्रकरणात अटकेत असलेला शार्प शुटर सुक्खा याने पोलिस तपासात धक्कादायक खुलासा केला आहे. सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन होता, अशी धक्कादायक माहिती शार्प शुटर सुक्खाने पोलिसांना दिली आहे. Salman Khan

हरियाणा आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुक्खा नावाच्या बिश्नोई टोळीच्या सदस्याला पानिपत येथून अटक करण्यात आली. नवी मुंबईतील पनवेल शहर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सलमान खानकडून सुपारी घेणाऱ्या बिष्णोई टोळीच्या शार्प शूटरला अटक केली. सलमान खानच्या पनवेल येथील घरी त्याने रेकी केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!