Salary : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 4 % वाढणार, सॅलरीनुसार किती पगार वाढणार? जाणून घ्या…
Salary : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. मार्च २०२४ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता.
तसेच आधी हा भत्ता ४६% एवढा होता मात्र हा भत्ता ५०% करण्यात आला. तसेच ही वाढ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. पहिली महागाई भत्ता वाढ तर दिली गेली आहे.
आता सरकारी कर्मचारी दुसऱ्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार हिरवा कंदील दाखवणार आहे.
दिवाळीच्या आधीच या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सही करतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढेल असे म्हटले जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५० टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये यात आणखी चार टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणजेच महागाई भत्ता ५४% होईल. Salary
महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जुलै २०२४ पासून लागू राहणार आहे. अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. दरम्यान आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए ५४% झाल्यानंतर त्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते या संदर्भात अगदी थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ज्याचे मूळ वेतन ३०००० आहे त्याला सध्याच्या ५०% दराने १५००० रुपये महागाई भत्ता मिळतोय. पण जेव्हा हा महागाई भत्ता 54% होईल तेव्हा त्याला महागाई भत्ता म्हणून १६२०० मिळणार आहेत म्हणजेच त्याच्या पगारात १२०० रुपयांची वाढ होणार आहे.